नाशिकच्या अभ्यासिका अन हवामान खूपच छान - नितीन गडकरी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नाशिक: नाशिकमध्ये दोन गोष्टी मला खूप आवडल्या. नाशिक सारख्या अभ्यासिका भारतात कुठेही नाही. तसेच इथले हवामान आमच्या नागपुरमध्येही नाही, या शब्दांमध्ये केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकबद्दल प्रेम व्यक्त केले.
हिरावाडी येथील पंडीत दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचे रविवारी (दि.३) गडकरी यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, माझी पत्नी विमानात सोबत होती आणि म्हणत होती नाशिकची शेती किती सुंदर आहे. गोदावरी सुंदर आहे, हवामान मस्त आहे. तुमच्याकडे 450 गार्डन आहेत. आमच्याकडे दोनशेच गार्डन आहेत.नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे अशी अपेक्षा व्यक्त करत महापौर आणि महापालिका आयुक्तांनी अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला. पुढिल पाच वर्षात ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण मुक्त नागपुर करेल असं मी ठरवलंय. प्रत्येक शहराच्या महापौर आणि आयुक्तांनी ठरवल्यास आपण पुढे जाऊ.सर्व ध्वनि प्रदूषणला जबाबदार मी आहे.त्यामुळे लाल दिवे मी बंद केले.त्यामुळे बरेच जण माझ्यावर नाराज आहे असे सांगत मर्सिडीज असो की बीएमडव्लू कोणतीही कार असो कर्कश आवाज चालणार नाही, असा कायदाच मी करणार आहे.सर्व वाहनांना भारतीय वाद्य हवे.
रुग्णवाहिका व पोलिसांच्या वाहनांना कर्कश हार्न चालणार नाही.नाशिक शहराच्या इंधनाबाबत सगळ्यांनी मिळून एअर प्रदूषण दूर केल्यास डॉक्टरची प्रैक्टिस कमी होईल. प्रदूषण कमी करण्यासाठी महामार्गालागत 3 मीटर उंच झाडे लावा.माझ्या खात्यातून मी मदत करतो अशी ग्वाही त्यांनी दिली.