नगर - ई पीक पाहणी शेतक-यांच्या दृष्टीने नव्या युगाची सुरूवात - बाळासाहेब थोरात
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार मध्ये मागील दीड वर्षापासून महसूल मंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे.सातबारा दुरुस्तीसह दोन ऑक्टोबर पासून डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर नव्याने सुरू केलेल्या ई पीक पाहणी प्रकल्प हा देशासाठी आदर्शवत असून शेतकर्यांच्या साठी नव्या युगाची सुरुवात ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. आनंदवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने ई पीक पाहणी योजनेत शंभर टक्के नोंदणी केल्याबद्दल झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी आर.बी.रहाणे होते.
याप्रसंगी थोरात यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष ई पिक पाहणी केली.त्याचबरोबर शेतक-यांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाइन डिजिटल सातबाराचे वितरणही करण्यात आले.यावेळी बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले की,ई पीक पाहणी ही नवी योजना शेतक-यांच्या जीवनात नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे.या योजनेमुळे सर्वांना स्वत:ची पीक पाहणी स्वत: नोंद करता येणार आहे.तसेच सध्या रायात व देशात कोणते पीक किती रोपण झाले आहे. कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आहे.याची अद्यावत माहिती सुद्धा मिळणार आहे.महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना खरी तर देशासाठी आदर्श वत ठरणारे आहे.मागील दीड वर्षापासून महसूल मंत्रिपदाच्या काळात आपण नव्याने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे.यातून ऑनलाईन सातबारा ई-फेरफार शेतकर्यांना अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने मिळत आहेत.सात बारावरील अनावश्यक नोंदी कमी करण्यात आल्या आहेत.दोन ऑक्टोबर गांधी जयंती पासून सर्व शेतकर्यांना सातबारा घरपोच मिळणार आहे.संगमनेर तालुक्यात मागील वर्षी मॉडेल म्हणून या ई पिक पाहणी अभियानाची सुरुवात केली.संपूर्ण राज्यामध्ये ई पीक पाहणी लागू करण्यात आली आहे.संगमनेर तालुक्यात सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली असून उर्वरित गावांमधील शेतकर्यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन थोरात यांनी केले.