डॉ एस.जयशंकर तीन देशांच्या दौऱ्यावर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर 2 ते 5 सप्टेंबर या काळात स्लोव्हेनिया, क्रॉटिया आणि डेन्मार्क या तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहे. 2-3 सप्टेंबर दरम्यान जयशंकर स्लोव्हेनियात असणार आहेत तर क्रॉटिया येथे 3 सप्टेंबरला आणि डेन्मार्क येथे 4-5 सप्टेंबरला जयशंकर भेट देणार आहेत.
युरोपीय संघाच्या परिषदेचे अध्यक्षपद सध्या स्लोव्हेनियाकडे असून युरोपीय संघाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रांच्या अशासकीय-मैत्रीपूर्ण एकत्रीकरण कार्यक्रमासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 3 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आहे. यासोबत डॉ सुब्रमण्यम जयशंकर स्लोव्हेनियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली.