जीईएमद्वारे विक्रेत्यांना लाभणार विस्तारित बाजारपेठ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : मेक इन इंडिया उपक्रमाला बळकटी देण्यासाठी एमएसई, महिला बचतगट आणि स्टार्टअप्स सारख्या विक्रेत्यांना जीईएम पोर्टल विस्तारित बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे सचिव डॉ. अनुप वाधवान म्हणाले की, जीईएम पोर्टल हे लघु आणि मध्यम उद्योग (एमएसई), महिलांचे बचत गट, स्टार्टअप्स या सारख्या विक्रेत्या गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मेक इन इंडिया उपक्रम आणि भारत सरकारच्या धोरणानुसार एमएसई या सारख्या स्थानिकांना बळकटी देणासाठी विस्तारित बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. अनुप वाधवान म्हणाले की, सध्या जीईएम पोर्टलकडे (GeM) 6,90,000 एमएसई विक्रेते आणि सेवा पुरवठादार हे सध्या पोर्टलच्या एकूण ऑर्डर मूल्याच्या 56% पेक्षा अधिक सहभाग नोंदवित आहेत, हा त्यांच्या यशाचा दाखला आहे. गेल्या आर्थिक वर्षापासून (2019 – 2020) GeM च्या पटलावर नोंदणीकृत एमएसईंची संख्या 62 % नी वाढली आहे. आणि हे विलक्षण यश आहे की, आर्थिक वर्ष 2016 – 17 मध्ये केवळ 3000 पर्यंत एमएसएमई होते.
ऑगस्ट 2017 मधील पाहणी पासून, GeM ने 52,275 शासकीय खरेदीदारांसाठी 18.85 लाख नोंदणीकृत विक्रेते आणि सेवा पुरवठादारांकडून 1,11,113 कोटींच्या 67.27 लाख ऑर्डरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 6,95,432 एमएसई विक्रेते आणि सेवा पुरवठादार यांनी GeM च्या एकूण ऑर्डर मूल्याच्या 56.13 टक्के ऑर्डर पूर्ण केल्या आहेत.
एमएसएमईना कर्ज मिळविण्याबाबत आव्हानांना सामोरे जावे लागताना विशेषत्वाने एसएमई यांच्यासाठी GeMSAHAY हे अद्ययावत अप्लिकेशन सुरू करण्यात येत आहे. #GeMSAHAY हा उपक्रम फिनटेकचा लाभ करून घेऊन विनाअडथळा वित्तपुरवठा करू शकतो. एमएसई यांना आता #GeM प्लॅटफॉर्मवरील ऑर्डर स्वीकारण्याच्या टप्प्यावर कर्ज मिळू शकते. चालू भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि एमएसईंसाठी वित्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी यामुळे मदत होऊ शकेल.
GeM हे इंडियन सॉफ्टवेअर प्रॉडक्ट इंडस्ट्री राऊंड टेबल (iSPRINT) यांच्यासह सहयोग करीत आहे. ना नफा तत्वावरील तांत्रिक थिंक टँकचा स्वयंसेवी गट GeM-SAHAY प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी असेल, जो एमएसएमईच्या GeM प्लॅटफॉर्मवरील नेमक्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कर्ज सुविधेसाठी अर्ज करणारे मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून विनाअडथळा एन्ड टू एन्ड डिजिटल कार्यपद्धतीचा अनुभव घेतील.