गांदरबलमध्ये ढगफुटीने हाहाकार; धर्मशाळेतही पूर परिस्थिती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जम्मू काश्मिरातील गांदरबलमध्ये आभाळ फाटल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गांदरबल जिल्ह्यात ढगफुटी झाल्यानं हाहाकार उडाला असून, अचानक झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. गांदरबलमधील ढगफुटी झालेल्या भागातील दृश्ये समोर येऊ लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं असून, नद्यांनाही पूर आला आहे. ढगफुटीमुळे घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथेही अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जम्मू काश्मीरमधील गांदरबल आणि हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत पावसाने हाहाकार उडवला आहे. गांदरबल जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. ढगफुटी झाल्याने जिल्ह्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटी होण्यापूर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. तुफान पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली असतानाच ढगफुटी झाल्यानं हाहाकार उडाला आहे.
ढगफुटी झाल्यानं गांदरबलमधील काही भागात प्रचंड नुकसान झालं असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. असंख्य घरांचं नुकसान झालं आहे. यात सुदैवान कोणतीही जीवित हानी झालेली नसली, तरी ढगफुटी झाल्यानं अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. पावसाचा जोर वाढल्यानं अनेक महामार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.