संरक्षण क्षेत्रात उत्पादनाच्या प्रचंड संधी - राजनाथ सिंह

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

संरक्षण क्षेत्रात उत्पादनाच्या प्रचंड संधी - राजनाथ सिंह

नागपूर : देशाच्या संरक्षण क्षेत्रात उत्पादनाच्या प्रचंड संधी आहेत. संरक्षण क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग असावा यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी यायला हवे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. मंगळवारी नागपुरात त्यांच्या हस्ते ईईएल (इकॉनॉमिक एक्स्प्लोजिव्हज लिमिटेड) ने उत्पादित केलेले मेड इन इंडिया मल्टिमोड ग्रेनेड्स भारतीय सैन्यदलाला हस्तांतरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
संरक्षण क्षेत्रात भारताची जागतिक पातळीवर आयात करणारा देश अशी ओळख आहे. ही ओळख आम्हाला बदलायची असून संरक्षण उत्पादनांचे निर्यात करणारा देश अशी प्रतिमा तयार करायची आहे. संरक्षण मंत्रालयाने प्रथमच संरक्षण उत्पादन निर्यात प्रसार धोरणाचा मसुदा जारी केला आहे. या धोरणामुळे २०२५ पर्यंत वार्षिक पावणेदोन लाख कोटींची उलाढाल होणे शक्य होईल. या धोरणामुळे केवळ संरक्षण क्षेत्रालाच बळकटी मिळणार नाही, तर भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राला नवीन दिशा मिळेल, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले.