साकीनाका अत्याचार प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : साकीनाका भागात महिलेवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. याआधी पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपीवर बलात्कार आणि खुनाची कलमे समाविष्ट करण्यात आली होती.
पीडितेच्या अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो दखल घेतली होती. त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तांना पत्रही पाठवले होते. दरम्यान, आता आयोगाच्या सदस्यांनी रविवारी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणाचीही आयोगाने पाहणी केली. त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हालदार यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
साकीनाका येथे शुक्रवारी पहाटे महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार करून त्यानंतर तिला मारहाण आणि गंभीर दुखापतही करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी मोहन चौहानला पोलिसांनी अटकही केली होती. पीडितेचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी राजावाडी रुग्णालयात दुर्दैवी अंत झाला.