‘लबाडी टाळा आणि आत्मपरिक्षण करा’; न्यायालयाचा सुजय विखेंना सल्ला
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अहमदनगर : अहमदनगरचे भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी १० हजार रेमडेसिविर अवैधपणे वितरित केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने डॉ. सुजय विखे यांना चांगलेच फटकारले. अहमदनगरच्या राहुरी येथील अरुण कडू आणि इतर तीन जणांनी वकील प्रज्ञा एस. तळेकर यांच्यामार्फत खासदार सुजय विखे यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. एका खासदाराने अवैधरित्या कोविड -१९ च्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविरच्या इंजेक्शन्सचा साठा आणल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सुधारीत याचिकेत कोविड -१९ च्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या वाटपाबाबत अन्य राजकीय नेत्यांवरसुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स उतरवताना व्हीडिओ काढण्याचं नाटक त्यांना टाळता आलं असतं. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशाप्रकारे स्वत:चे ओळख वापरून दिल्लीतून इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा त्यांनी टाळायला पाहिजे होता,” अशा शब्दात न्यायालयाने विखे यांना फटकारले. न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती भालचंद्र यू. देबदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. अहमदनगरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार शिरीष गुप्ते यांनी सुजय विखे यांच्या बाजूने युक्तीवाद केला.
कोविड -१९ च्या उपचारासाठी वापरल्या जाणार्यात रेमडेसिविरच्या इंजेक्शन्सचा ‘बेकायदेशीर’ आणि ‘गुप्त’पणे खरेदी करुन वाटल्याचा आरोप गुप्ते यांनी नाकारला. सुजय विखे यांच्या चार्टर्ड विमानात १५ बॉक्स होते आणि त्यामध्ये १०,००० नव्हे तर फक्त १२०० इंजेक्शन्स आणल्याचे गुप्ते यांनी स्पष्ट केले.