रिंकू राजगुरू 'या' चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आता ‘200 – हल्ला हो’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. झी 5 ने याचा ट्रेलर रिलीज केला. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. येत्या २० ऑगस्टला हा चित्रपट झी 5 वर प्रदर्शित होणार आहे.
अशी आहे चित्रपटाची संकल्पना
हा चित्रपट एका अतिशय गंभीर समस्येवर भाष्य करणारा आहे. ही घटना कित्येक वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा २०० दलित महिलांनी एकत्रितपणे कायदा आणि न्याय हातात घेतला होता. हा चित्रपट दलित महिलांविषयी आहे ज्यांना सामाजिकदृष्ट्या उपेक्षित, छेडछाड, छळ आणि अपमानित असूनही, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या जबाबदार व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी कायदा आपल्या हातात घ्यावा लागला. या माध्यमातून काय बरोबर किंवा काय अयोग्य, याचाही उहापोह दिसून येईल. समाजात बऱ्याचदा स्त्रियांची मते डावलली जातात. त्यातही दलित स्त्रियांचा मत व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेतलेला असतो. हा चित्रपट अशाच एका कथेवर आधारीत असणार आहे.
लढाऊ भूमिका साकारताना खूप छान वाटलं - रिंकू राजगुरू
आपल्या भूमिकेविषयी रिंकू म्हणाली की, ही एक अशी मुलगी आहे, जी स्वतः एका दलित कुटुंबातून पुढे आली आहे. तिने वर्षानुवर्षे स्त्रियांवर होणारा अत्याचार पाहिला आहे. इतका अत्याचार सहन करूनही या स्त्रिया गप्प का बसतात, असा प्रश्न तिला नेहमीच पडत असतो. आता ही मुलगी स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे. इतकंच नाही तर या स्त्रियांच्या आणि आपल्या हक्कासाठी जोरदार लढा देणार आहे, अशी लढाऊ व्यक्तीची भूमिका साकारताना मला देखील खूप छान वाटलं चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अभिनेता बरुण सोबती, उपेंद्र लिमये, इंद्रनील सेनगुप्ता आदी दिग्गज कलाकार असणार आहेत.