देशात चार्जिंग स्टेशन वेगात स्थापन हाेताहेत, पार्किंगमध्ये ईव्ही चार्जर सुविधा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली :
देशात इलेक्ट्रिक वाहनांचा(ईव्ही) वाढता वापर सध्या होत नाही. मात्र, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांची तयार जोरात सुरू आहे. पेट्रोल पंप परिसरात चार्जिंग स्टेशन होत आहेत. पार्किंग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक चार्जर लावले जात आहेत. ज्या पद्धतीने सरकार आणि कंपन्यांचा भर इलेक्ट्रिक वाहनांवर आहे, त्या हिशेबाने काही वर्षांत पेट्रोल पंपांवर इंधनासाठी कमी आणि चार्जिंगसाठी जास्त उभी असलेली दिसतील.
देशात सध्या १,८६७ चार्जिंग स्टेशन आहेत, फेम-२ अंतर्गत दोन टप्प्यांत एकूण २,८७७ चार्जिंग स्टेशन्सना परवानगी मिळाली आहे. ही केवळ सुरुवात आहे. डझनावर कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत.
देशातील चार्जिंग नेटवर्क कंपनी मॅजेंटाने नुकतेच मुंबईमध्ये देशाचा सर्वात मोठा पब्लिक ईव्ही चार्जिंग स्टेशन केले आहे. या कंपनीने वित्त वर्ष २०२१-२२ च्या अखेरपर्यंत ४,००० चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आरईआयएल आणि मॅजेंटाशिवाय फोर्टम चार्ज अँड ड्राइव्ह, व्होल्टिक, चार्ज+ झोन, ईव्हीआय टेक्नॉलॉजीज आणि स्टॅटिकसारख्या कंपन्या या व्यवसायात याआधीच आल्या आहेत. टाटा पॉवरने एचपीसीएलसोबत त्यांच्या सर्व पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याचे करार केले आहेत.
शहरांत चार्जिंग स्टेशनची गरज खूप कमी असेल
शहरांपेक्षा जास्त महामार्गावर गरज भासेल. शहरांत लोक घरांत चार्ज करतील. हायवेवर गरज सध्या पेट्रोल पंपाच्या तुलनेत जास्त असेल. कारण, ईव्ही चार्जिंगमध्ये वेळ लागतो. मयंक जैन, संस्थापक, सीईओ ईफिल
ईव्हीचा आतापर्यंतचा अनुभव सांगतो की, शहरांत चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता खूप कमी असेल. लोक घरातच गाडी चार्ज करू शकतील. नॉर्व्हेत नवीन कारमध्ये ७५% ईव्ही असतात. ९०,००० होम चार्जर आणि केवळ ११०० फास्ट चार्जर आहेत. शहरांत चार्जर असतील. मात्र ते पार्किंगसारख्या ठिकाणी लागतील.