ड्रग्ज केक बनवणाऱ्या आरोपीला एनसीबीकडून अटक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत तीन वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत तिघा जणांना अटक केली. या आधी एनसीबीने ड्रग्ज केक बनवणाऱ्या बेकरीच्या प्रकरणात सचिन तुपे या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून LSD ड्रग्जच्या 11 ब्लॉट्स जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईतील मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी एका डब्यात अधिकाऱ्यांना 160 ग्रॅम गांजा मिळाला. या बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जात होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतले असून या बेकरीतील तिघांना अटकदेखील करण्यात आली.
दुसरीकडे, एका आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरविणाऱ्या रिक्षाचालकाला एनसीबीने अटक केली. गोरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली असून अफसार शेख असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.तर, माहिममध्ये एनसीबीने केलेल्या कारवाईत 60 ग्रॅम एमडी आणि 360 ग्रॅम गांजा जप्त केले असून या प्रकरणी एका आरोपीला अटकदेखील केली.