जसप्रीत बुमराहने २४ कसोटी सामन्यांत केले १०० गडी बाद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जसप्रीत बुमराहने २४ कसोटी सामन्यांत केले १०० गडी बाद

मुंबई,: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या कारकिर्दीतील २४ व्या कसोटी सामन्यात १०० गडी बाद केले आहेत. त्यामुळे तो भारताचा सर्वांत वेगवान गोलंदाज आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करत त्याने कपिल देवलाही मागे टाकले आहे. एकूणच सर्वांत जलद १०० कसोटी बळी घेणारा तो आठवा भारतीय आहे.
जसप्रीतने काल झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑली पोपला बाद करत आपला १०० वा बळी पूर्ण केला. कपिल देवने याआधी २५ कसोटी सामन्यांत १०० बळी घेतले होते. तर रविचंद्रन अश्विनने १८ कसोटी सामन्यांत १०० बळी घेतले आहेत.

गोलंदाजांमध्ये स्पिनर्स अव्वल
भारतासाठी सर्वांत वेगवान १०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्पिनर्स अव्वल सात ठिकाणी आहेत. अश्विनपाठोपाठ इरापल्ली प्रसन्ना (२० कसोटी), अनिल कुंबळे (२१ कसोटी), भागवत चंद्रशेखर (२२ कसोटी), सुभाष गुप्ते (२२ कसोटी), प्रज्ञान ओझा (२२ कसोटी), विणू मंकड (२३ कसोटी) आणि रवींद्र जडेजा (२४ कसोटी) कसोटी).


कारकीर्द

२७ वर्षीय जसप्रीतने जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. तेव्हापासून त्याच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहिला आहे. सध्या तो कसोटीत भारताचा क्रमांक एकचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याच्या १०० पैकी ९६ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियात ३२, इंग्लंडमध्ये ३२, दक्षिण आफ्रिकेत १४, वेस्ट इंडिजमध्ये १३ आणि न्यूझीलंडमध्ये सहा विकेट्सचा समावेश आहे. भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर चार विकेट्स आहेत.