आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : शिवाचे पाचवे पदक निश्चित
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
दुबई : भारताचा अनुभवी बॉक्सर शिवा थापाने आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील सलग पाचवे पदक ुनिश्चित करताना उपांत्य फेरी गाठली. मात्र भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीनला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला .पुरुषांच्या ६४ किलो वजनी गटात शिवाने मंगळवारी कुवैतच्या नादेर ओदाहला ५-० अशी धूळ चारली. उपांत्य फेरीत शिवासमोर गतविजेत्या बखोदूर उस्मानोव्हचे आव्हान असेल.
२७ वर्षीय शिवाने २०१३मध्ये या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०१५ आणि २०१९मध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर २०१७मध्ये त्याने रौप्यपदक पटकावले. यंदाच्या स्पर्धेतही उपांत्य फेरी गाठल्यामुळे त्याचे किमान कांस्यपदक नक्की झाले आहे. या स्पर्धेत सलग पाच पदके जिंकणारा तो भारताचा पहिला पुरुष बॉक्सिंगपटू ठरला आहे.
अन्य लढतीत हुसामुद्दीनला (५६ किलो) उझबेकिस्तानचा विश्वविजेता मिराझिजबेक मिर्झाहालिलोव्हने ४-१ असे पराभूत केले. तसेच भारताच्या सुमित संगवानला इराणच्या मेस्याम घेस्लाघीने ५-० असे नमवले.