आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर नेटकऱ्याने फातिमाला दिला सल्ला
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे चर्चेत आहे. या चर्चा त्यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर घटस्फोट घेतल्यामुळे सुरु झाल्या आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण सोशल मीडियावर मात्र अभिनेत्री फातिमा सना शेखमुळे आमिरने घटस्फोट घेतल्याचे म्हटले जाऊ लागले. अनेकांनी फातिमाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण आता एका यूजरने फातिमाला पाठिंबा दिला असून सल्ला दिला आहे.
आमिर खान आणि फातिमा सना शेख यांनी ‘दंगल’ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर तिने ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या आमिरच्या चित्रपटात देखील काम केले. या चित्रपटाच्या वेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आमिर आणि फातिमाने या सर्व अफवा असल्याचे नेहमीच म्हटले. आता आमिर आणि किरणच्या घटस्फोटामागचे कारण फातिमा असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी फातिमाला सुनावले. तर काहींनी तिला पाठींबा दिला. एका यूजरने कमेंट करत फातिमाला कमेंट बॉक्स सर्वांसाठी बंद करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने फातिमाला जबाबदार ठरवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे. ‘एखाद्या व्यक्तीच्या घटस्फोटाला दुसरं कोणाला तरी जबाबदार ठरवताना लाज वाटली पाहिले. घटस्फोट घेणे हा पूर्ण पणे त्यांचा निर्णय असतो. तुम्ही एखाद्याच्या घटस्फोसाठी तिसऱ्याच व्यक्तीला कसे जबाबदार ठरवू शकता’ असे एका यूजरने म्हटले आहे.