अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या 78 पैकी 16 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अफगाणिस्तानातून मंगळवारी भारतात आलेल्या 78 पैकी 16 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. खबरदारी म्हणून सर्व 78 लोकांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. सर्व 16 लोक लक्षणेहीन आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये व्हायरसचे लक्षण नाहीत. या 16 लोकांमध्ये तीन शिखांचाही समावेश आहे, ज्यांनी काबूलमधून त्यांच्या डोक्यावर श्री गुरु ग्रंथ साहिबच्या तीन प्रती आणल्या होत्या.
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांना दिल्ली विमानतळावर या प्रती घेतल्या आणि त्यातील एक प्रत आपल्या डोक्यावर घेऊन गेले. आतापर्यंत 626 लोकांना अफगाणिस्तानातून भारतात आणण्यात आले आहे, ज्यात 77 अफगाण शीख आणि 228 भारतीयांचा समावेश आहे. या भारतीयांमध्ये अफगाणिस्तानच्या दूतावासात काम करणाऱ्या लोकांचा समावेश नाही.
काबूल विमानतळाबाहेर अजूनही हजारोंची गर्दी
तालिबानच्या दहशतीमुळे देश सोडण्यासाठी मोठ्या संख्येने लोक प्रयत्न करत आहेत. हजारो लोक कच्च्याबच्च्यांसह उपाशीपोटी विमानतळाबाहेर उभे आहेत. त्यांना अमेरिका, युरोपीय देशात जाण्याची इच्छा आहे. अशा लोकांची संख्या आता ३० हजारांवर पोहोचली आहे. त्यात पासपोर्ट नसलेलेही अनेक लोक आहेत. लोकांना परदेशात जाऊन शांततेत जीवन जगण्याची इच्छा आहे.