शेतकरी आत्महत्यांकडे सरकारचे दुर्लक्ष -फडणवीस
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असून त्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष म्हणजे सत्तेच्या गुळाला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर यंत्रणाच नाही. शासकीय अधिकारी, सत्ताधारी लोकप्रतिनिधी, पालकमंत्री व सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असून त्यांना दिलासा देणारा एकही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या व त्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. शेतकऱ्याने मंत्रालयापुढे आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार असल्यामुळे सीबीआय व ईडीला माहिती देत नाही का, असा सवाल करून फडणवीस म्हणाले, उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही सरकारची ही माहिती देण्याची तयारी नाही. सत्ताधारी पक्षांमध्ये काही वेळा मतभेद असल्याचे दिसून आले, तरी ते वरवरचे आहे. आपला हिस्सा मिळाला नाही की वाद होतात व नंतर सुरळीत होते. त्यांची विचारांची युती नसून सत्ता लालसेपोटी आहे.
शिवस्मारकाचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे थांबले आहे. ती उठविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांत काहीही केले नसून त्याबाबत तातडीने पावले टाकली जाणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.