वाहतूक सेवा विस्कळीत; अनेक ट्रेन रद्द

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वाहतूक सेवा विस्कळीत; अनेक ट्रेन रद्द

मुंबई, : मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. या पावसाचा परिणाम मुंबई लोकल सेवेवरही झाला. अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. सीएसएमटीवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच पावसामुळे कल्याण-मुंबई लोकल सेवाही सकाळी काही काळासाठी ठप्प झाली होती. प्रवासी एक तास प्रतीक्षा करुन घरी परतले. बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या.

दादर परळमध्ये मुसळधार पाऊस

मुंबईतील दादर, परळ परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यासह दक्षिण मुंबईतही पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. दिवसभरात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील काही भागात पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी गाड्या वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर, कांदीवलीतील काही भागांतील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.



मिठी नदीचे पाणी ओव्हरफ्लो

पावसामुळे मिठी नदीचे पाणी ओव्हरफ्लो झाले आहे. आता मिठी नदीचे पाणी 4.2 झाले आहे. तसेच दहिसरमध्ये २४९ मिमी, तर सांताक्रूजमध्ये २१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.