वसुली प्रकरणी परमबीर सिंह, वाझेसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : व्यापार्याकडून नऊ लाख रुपयांची वसुली केल्या प्रकरणी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमल अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यासह सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांचा समावेश आहे.
अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जानेवारी-फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२१ दरम्यान आरोपींनी त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांची वसुली केली. अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या भागिदारी गोरेगावमध्ये बोहो (BOHO) रेस्टॉरेंट अँड बार आणि अंधेरीच्या ओशिवरामध्ये बीसीबी (BCB) रेस्टॉरेंट अँड बार आहे. हा बार चालवण्यासाठी वाझे आणि दुसऱ्या आरोपींनी नऊ लाख रुपये आणि सॅमसंग कंपनीचे फोल्ड दोन मोबाईल हफ्ता म्हणून घेतले होते.