विघातक शक्ती काही काळासाठी राज्य करू शकतील, कायमस्वरुपी नाही – नरेंद्र मोदी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
दहशतवादाद्वारे साम्राज्य निर्माण करण्याच्या विचारधारेचे पालन करणाऱ्या विघातक शक्ती, काही काळासाठी वर्चस्व गाजवू शकतील परंतु त्यांचे अस्तित्व कायमचे नाही. ते मानवतेला कायमस्वरूपी दडपू शकत नाहीत.” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केलं आहे. गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या काही प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मोदींनी म्हटले की, “सोमनाथ मंदिर अनेकदा तोडलं गेलं, अनेकदा मूर्तींची तोडफोड केली गेली आणि याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु हे प्रत्येक विघातक हल्ल्यानंतर आपल्या पूर्ण गौरवाने समोर आले, जे आपल्याला आत्मविश्वास देते.”
मोदी म्हणाले की, विनाशासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि दहशतवादाने साम्राज्य निर्माण करण्याच्या विचारधारेचे पालन करणाऱ्या विघातक शक्ती, काही काळासाठी वर्चस्व गाजवू शकतात परंतु त्यांचे अस्तित्व कायमचे नाही. ते मानवतेला कायमस्वरूपी दडपू शकत नाहीत. हे खरं होतं जेव्हा सोमनाथ मंदिराला अगोदर नष्ट केलं जात होतं आणि ते आजही खरं आहे.
तसेच, २०१३ मध्ये प्रवास व पर्यटनाच्या यादीत ६५ व्या क्रमांकावर असलेला, भारत आता २०१९ मध्ये ३४ व्या स्थानावर पोहचला आहे. अशी देखील यावेळी मोदींनी माहिती दिली.