राज्यपाल गणेशन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत मणिपुरचे नवनियुक्त राज्यपाल ला. गणेशन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी मुखकवच आणि सामाजिक अंतराचे पालन करीत विविध विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.
डॉ लोकनाथन मुरुगन
तत्पूर्वी ला. गणेशन आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ लोकनाथन मुरुगन यांची सदिच्छा भेट झाली. याबाबत डॉ लोकनाथन मुरुगन ट्वीटर द्वारे म्हणाले, " माननीय मणिपुरचे राज्यपाल ला. गणेशन यांना भेटून आनंद झाला. " ला. गणेशन आणि डॉ लोकनाथन मुरुगन तमिळनाडूचे आहेत.