मुंबई विमानतळावर ४.९५ किलो हेरॉईन जप्त, आरोपींना न्यायालयीन कोठडी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर सुमारे ४.९५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. हे हेरॉईन भारतात आणण्यासाठी दोन्ही महिला प्रवाशांना प्रत्येकी पाच हजार डॉलर देण्याचे सांगण्यात आले होते. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कतार एअरलाईन्समध्ये प्रवास करणारी आई-मुलगी या जोहान्सबर्ग येथून मुंबईला येत होत्या. फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचाराच्या नावाखाली या दोघीही भारतात आल्या होत्या. त्या दोघींकडून हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या तस्करांनी ट्रॉली बॅगमध्ये हेरॉईन लपवून ठेवले होते. आत्तापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.