भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं मिळवलं ऑलिम्पिकचं तिकिट!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं मिळवलं ऑलिम्पिकचं तिकिट!

जपानमध्ये होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने आपले तिकिट पक्के केले आहे. एमएएसएच प्रकारातील पुरुष एकेरी स्पर्धेसाठी नागरला ऑलिम्पिक कोटा देण्यात आला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) नागरला ऑलिम्पिक कोटा दिला. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या नागरने याबद्दल आनंद व्यक्त केला.

मोठी कामगिरी केल्यानंतर नागर म्हणाला, “ही माझ्यासाठी मोठी कामगिरी आहे. मी गेल्या एक वर्षापासून कठोर परिश्रम केले आहेत आणि टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणे हे माझ्यासाठी स्वप्नासारखेच होते.”

२०१८च्या पॅरा एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणारा नागर म्हणाला, ”टोकियोमध्ये चांगले निकाल मिळवण्यासाठी मी अजून कठोर परिश्रम घेत आहे. मी लखनऊमध्ये एका प्रशिक्षण शिबिरात जात आहे. शिबिरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि मला आशा आहे, की या शिबिराचा मला खूप फायदा होईल.” पॅरा-बॅडमिंटनपटू तरुण (एसएल ) आणि प्रमोद भगत (एसएल ) यांनीही आपापल्या गटात पॅरालिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे.

 

जैव-सुरक्षेच्या परिघातून भारतीय खेळाडू मुक्त!

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने विलगीकरणाला सामोरे जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना जुलै महिन्यात जैव-सुरक्षित वातावरणाच्या परिघातून बाहेर पडण्याची संधी मिळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ते इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी यादरम्यान एका महिन्याहूनही अधिक अवधी असल्याने खेळाडूंच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांना तीन आठवडय़ांच्या विश्रांतीची परवानगी दिली आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर थेट ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होईल.

‘‘जागतिक अजिंक्यपदाची अंतिम फेरी आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यामध्ये तब्बल ४२ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस भारतीय खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणाच्या बाहेर पडतील. १४ जुलैपर्यंत त्यांना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा विलगीकरणाला प्रारंभ करावा लागेल,’’ असेबीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. यादरम्यान खेळाडूंना मित्रमंडळी, कुटुंबीयांसह मनसोक्त हिंडण्याची परवानगी असेल.