“भाजपाला टीका सहन होत नाही, त्यांना तो राष्ट्रद्रोह वाटतो”, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची टीका
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. “भाजपा टीका सहन करू शकत नाही आणि ते त्याला राष्ट्रद्रोह मानतात. लोकशाहीत टीका करणे स्वागतार्ह आहे परंतु हे लोक (भाजप) टीका सहन करू शकत नाहीत,” असे गेहलोत म्हणाले. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते.
७० वर्षांत देशात काय घडले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजप नेत्यांना लक्ष्य करत गेहलोत म्हणाले, काँग्रेसने देशात लोकशाही बळकट केली आणि देशाला एकसंध ठेवले. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देशाच्या विकासात काँग्रेस नेत्यांचे योगदान आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बलिदानाची आठवण करून देताना मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, “आपल्या देशाच्या त्या महान नेत्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही बलिदान दिले. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देशाच्या विकासात काँग्रेस नेत्यांचे योगदान आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बलिदानाची आठवण करून देताना मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, आपल्या देशाच्या त्या महान नेत्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही बलिदान दिले. त्यांनी तुरुंगवास भोगला त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले.”
म्हणूनच इथे सरकारे बनतात
‘माहिती तंत्रज्ञानाद्वारे सुशासन’ या विषयावर राजस्थान इनोव्हेशन व्हिजन (राजीव – २०२१) च्या आभासी कार्यक्रमाला संबोधित करताना गेहलोत म्हणाले, “७० वर्षांत तुम्ही काय केले हे सांगणे खूप सोपे आहे? ७० वर्षात देश एकसंध ठेवला, अखंड ठेवला, लोकशाही मजबूत ठेवली. पाकिस्तानप्रमाणे इथे लष्करी राजवट लागू दिली नाही. म्हणूनच इथे सरकारे बनतात, ती बदलतात आणि सध्याचे सरकार बनले आहे कारण देशात लोकशाहीची मुळे मजबूत आहेत.”
टीका करने देशद्रोह मानला जातो
भाजप नेत्यांवर आक्षेप घेत ते म्हणाले, “ते देशाच्या महान परंपरेबद्दल बोलतात, पण त्यांना टीका सहन होत नाही. टीका हा राष्ट्रद्रोह मानला जातो. ज्याप्रकारे देश चालला आहे याबद्दल आपणही काळजी करायला हवी.” राजीव गांधींनी पंतप्रधान म्हणून घेतलेल्या क्रांतिकारी पावलांचा उल्लेख करून गेहलोत म्हणाले की, राजीव गांधींची विचारसरणी इतिहासात नोंदलेली आहे.