भाजपने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भाजपने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती

गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर विजय रुपाणी यांचा उत्तरार्धी निश्चित करण्यासाठी तसेच नूतन नेतृत्वावर मंथन आणि चर्चा करण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

लवकरच केंद्रीय आणि राज्य नेतृत्व संयुक्तपणे चर्चा करून आगामी मुख्यमंत्री कोण असे यासाठी नाव निश्चित करणार असल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, पुरुषोत्तम रुपाला, भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील , राष्ट्रीय संगठन मंत्री बी एल संतोष आणि अन्य मान्यवर गांधीनगर येथे या मंथनात सहभागी असणार आहेत. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे गुजरातमध्ये नेतृत्व बदलावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.