बजरंग पुनियाला कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानाला दाखवलं अस्मान!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.
सामन्यापूर्वी बजरंगच्या वडिलांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती. ”माझा मुलगा आजपर्यंत कधीही रिकाम्या हाताने परतला नाही. संपूर्ण देशाच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. महिनाभरापूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तरीही त्याने उपांत्य फेरी गाठली. दुखापतीमुळे तो आक्रमक खेळू शकला नाही”, असे बजरंगच्या वडिलांनी म्हटले होते.
बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. अलीयेवविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटात बजरंगने एक गुणाने आघाडी घेतली होती. पण, अझरबैजानच्या पैलवानाने बजरंगवर वर्चस्व राखले.उपांत्यपूर्व फेरीत बजरंग ०-१ ने पिछाडीवर होता. यानंतर बजरंगला शेवटच्या मिनिटात २ गुण मिळाले. त्यानंतर त्याने इराणी कुस्तीपटूला सामन्याबाहेर फेकून दिले.