नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 12 जण गंभीर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
रायपूर, : छत्तीसगडच्या घोटीयामध्ये गुरुवारी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात 12 निरपराध नागरिक जखमी झालेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान आता नक्षलवादी सामान्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.
छत्तीसगडच्या रायपूरपासून 400 किलोमीटर अंतरावरील घोटीयामध्ये नक्षलवाद्यांनी गुरुवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमाराला आईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये गाडीतील 12 नागरिक जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटात गाडीमध्ये बसलेले 12 नागरिक जखमी झाले. यात एका महिलेचाही समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले. नारायणपूरहून आलेली बोलेरो कार दंतेवाडाच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाला. स्फोट झाल्यानंतर सुरक्षापथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी चवताळले असून आता ते सर्वसामान्यांना लक्ष्य करीत असल्याचे दिसून येते.