दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वे सुरक्षेसाठी लवकरच नवीन मॉडेल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई, १६ सप्टेंबर (हिं.स.) : नवी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आले आहे. या पार्श्वभूमीवर आरपीएफचे आयुक्त जितेंदर श्रीवास्तव, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मध्य रेल्वेचे विभागीय संचालक शलभ गोयल यांच्यात बुधवारी एक महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत ॲक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. यामध्ये महिलांसह लोकलच्या सुरक्षेबाबत एक नवीन मॉडेल तयार करण्यात येणार आहे.
मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांसाठी एक प्रमुख लक्ष्य राहिले आहे. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेला दहशतवादी मुंबई लोकलने प्रवास करून दिल्लीला जात असल्याने मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. बुधवारी या पार्श्वभूमीवर जान मोहम्मद आणि त्याचा साथीदार गोल्डन टेंपल या गाडीने प्रवास करून दिल्लीला जात होते. तपास यंत्रणांनी त्यांना प्रवासादरम्यान ताब्यात घेतले. मात्र त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आले नाही.
हिंदुस्थान समाचार