कोरोना लसीच्या कमाईतून जगात 9 अब्जाधीशांचा उदय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना लसीच्या कमाईतून जगात 9 अब्जाधीशांचा उदय

कोरोनामुळे वर्षभरापासून संपूर्ण जग त्रस्त आहे. या काळात एकीकडे बहुतेकांना नुकसान सहन करावे लागले पण दुसऱ्या बाजूला काही जणांचे तर भाग्य फळफळले आहे.

. कोरोना लसीला परवानगी मिळाल्यानंतर झालेल्या नफ्यातून नऊ जण अब्जाधीश झाल्याचे पीपल्स व्हॅक्सिन अलायन्सने म्हटले अाहे. या लाेकांच्या संपत्तीमध्ये १९.३ अब्ज डाॅलरने (१.४१ लाख कोटी ) वाढ झाली असून त्यातून गरीब देशांना गरजेपेक्षा जास्त १.३ पट जास्त लसींचे डाेस मिळू शकतात.

द पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ हा विविध संघटना  आणि कार्यकर्त्यांचा गट अाहे जाे लसीच्या पेटंटचा अधिकार संपुष्टात अाणण्याची मागणी करत आहे.

. सहयाेगींच्या मते या नव्या नऊ अब्जाधीशांशिवाय ८ विद्यमान अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये २.३५ लाख कोटींनी वाढ झाली आहे.

माॅडर्ना फार्मास्युटिकलचे स्टीफन बॅन्सेल व बायोएंटेकच्या उगुर साहीन नव्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर  आहेत. ग्लोबल जस्टिस नाऊ या संस्थेच्या प्रमुख हायडी चाअाे म्हणाल्या, “ही लस करदात्यांच्या पैशाने बनली आहे. . काही लाेकांनी पैसे कमवावे अाणि कोट्यवधी लाेकांनी  कोरोनाच्या विळख्यात सापडावे हे याेग्य नाही. भारतासारख्या देशात दररोज हजारो लोक मरत असल्याने या अब्जाधीश मालकांनी हिताला प्राधान्य दिले पाहिजे.