ऑलिम्पिकमुळे सकारात्मकतेचा संदेश –बात्रा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
करोना विषाणू संसर्गामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या आयोजनास तीव्र विरोध होत आहे; परंतु टोक्योत ऑलिम्पिकचे आयोजन झाल्यास जग करोनावर मात करून आगेकूच करीत आहे, हा सकारात्मकतेचा संदेश देता येईल, असे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी शनिवारी व्यक्त केले.
जपानमध्ये भारतासह १५३ देशांकरिता हवाई र्निबध लागू करण्यात आले आहेत. याचा भारतीय क्रीडापटूंच्या ऑलिम्पिक सहभागावर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन बात्रा यांनी दिले. येत्या २३ जुलैपासून स्पर्धा सुरू होईल, असा विश्वास बात्रा यांनी व्यक्त केला.