विरोधकांमुळे संसदेचे कामकाज ठप्प, 133 कोटी व्यर्थ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विरोधकांमुळे संसदेचे कामकाज ठप्प, 133 कोटी व्यर्थ

नवी दिल्ली  : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 19 जुलै पासून सुरुवात झाली. परंतु, पेगासस कथित हेरगिरी आणि इतर मुद्यांवरून विरोधकांनी गोंधळ घालून संसदेचे कामकाज अनेक वेळा ठप्प केले. त्यामुळे दोन्ही सभागृहात आतापर्यंत केवळ 18 तास कामकाज होऊ शकले. तसेच कामकाज ठप्प झाल्यामुळे देशाच्या तिजोरीतून 133 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतपर्यंत 107 तासांचे कामकाज होणे अपेक्षित होते. परंतु, विरोधकांनी कथित हेरगिरी आणि इतर मुद्यांवरून कामकाज प्रभावित केले. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत केवळ 18 तासांचे कामकाज होऊ शकले. कामकाज ठप्प झाल्यामुळे देशाच्या तिजोरीतील 133 कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. गेल्या 19 जुलैपासून आतापर्यंत लोकसभेच्या केवळ 7 तास कामकाज झाले.दुसरीकडे, वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेतही हीच स्थिती आहे. राज्यसभेत केवळ 11 तास कामकाज झाले. दोन्ही सभागृहात वाया गेलेल्या तासांचा एकत्रित हिशोब लावला असता, एकूण 89 तास वाया गेले आहेत. दरम्यान, जनतेच्या 133 कोटी रुपयांहून अधिक पैसे या गदारोळामुळे वाया गेले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी संसदेत केलेल्या गदारोळामुळे पंतप्रधानांना संसदेत आपल्या नवीन मंत्र्यांचा परिचयही करून देता आला नाही. कामकाज तहकूब होईपर्यंत संसदेत गोंधळ सुरूच होता. भारतीय पत्रकार आणि काही राजकीय नेत्यांवर पेगाससद्वारे हेरगिरी केल्याच्या आरोपातून विरोधकांनी सरकारला खिंडित गाठलं होतं. तसेच ऑक्सिजनमुळे देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. यामुळेही विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पण संसदेत कामकाज सुरळीत झाल्याने जनतेचे सुमारे 133 कोटी रुपये वाया गेले आहेत.