टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : भाविना उपउपांत्यपूर्व फेरीत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
टोक्यो : भारताची आघाडीची क्रीडापटू भाविना पटेलने गुरुवारी टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस प्रकारात महिला एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. सोनल पटेलला मात्र साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.
३४ वर्षीय भाविनाने ब्रिटनच्या मेगान शॅक्लेटॉनला ३-१ (११-७, ९-११, १७-१५, १३-११) असे संघर्षपूर्ण लढतीत नमवले.पहिल्या लढतीत पराभव पत्करणाऱ्या भाविनाने ‘अ’ गटात दोन सामन्यांत तीन गुण मिळवून दुसऱ्या स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला.
दक्षिण कोरियाच्या ली-मि ग्यूने भारताच्या सोनलवर १०-१२, ११-५, ११-३, ११-९ अशी पिछाडीवरून मात केली.सलग दोन लढती गमावल्यामुळे सोनमचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
जलतरणपटू सुयश एका शर्यतीला मुकणार
अर्जुन पुरस्कार विजेता सुयश जाधव आजारामुळे जलतरणातील २०० मीटर शर्यतीला मुकणार आहे. सुयशच्या करोना चाचणीचा निकाल नकारात्मक आला असला, तरी सर्दी आणि घसा खवखवल्यामुळे त्याला दोन दिवस विश्रांती घेण्याचे आदेश डॉक्टरांनी दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाºया पहिल्या शर्यतीत तो सहभागी होणार नाही, अशी माहिती भारताचे पथकप्रमुख गुरशरण सिंग यांनी दिली. आता सुयश १ सप्टेंबरला १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि ३ सप्टेंबर रोजी ५० मीटर बटरफ्लाय शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करेल.