कोरोना चाचण्या वाढवण्याची पालकमंत्र्यांना सूचना

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना चाचण्या वाढवण्याची पालकमंत्र्यांना सूचना

महाराष्ट्रात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हळूहळू वाढत असला तरी चिंता किंवा काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र, ज्याअर्थी पॉझिटिव्हिटी दर वाढतोय त्याअर्थी टेस्टिंग रेटही वाढवला पाहिजे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री यांना टेस्टिंग वाढवण्याबाबत सुचवले असून मुख्यमंत्र्यांनीही हे मान्य केले आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही यात लक्ष द्यावे, अशा सूचना केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री टोपे म्हणाले, २४ तासांत राज्याची स्वॅब टेस्टिंगची क्षमता २ लाखांहून अधिक आहे, ती सध्या सव्वा-दीड लाख पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने टेस्टिंग केल्याच पाहिजेत. जालना जिल्ह्याचा विचार करता आपण दर आठवड्याला बैठक घेतो. तसेच प्रयोगशाळेची दोन-अडीच हजार टेस्टिंगची जी क्षमता आहे ती पूर्णपणे वापरली गेली पाहिजे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.