काबूलच्या सलीम कारवान परिसरात रॉकेट हल्ला
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
काबूल - ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आपले बचाव कार्य सुरू ठेवणार असून त्यापूर्वी राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सलमी कारवान परिसरात एक दिवस आधीच सोमवारी सकाळी रॉकेट हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. काबूलच्या सलीम स्फोटानंतर लगेच गोळीबार देखील झाला आहे. पण हा हल्ला आणि गोळीबार कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काबूल विमानतळाच्या वायव्य भागात रविवारी दुपारी देखील रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात तीन मुले मारली गेल्याचे अफगाणी अधिकाऱ्याने सांगितले. ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य माघारी घेण्याच्या घोषणेनुसार अमेरिकेने आता त्याचा अखेरचा टप्पा सुरू केला आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तास्थापनेसाठी तालिबानी नेत्यांच्या हालचालींनीही वेग घेतला आहे.