सुरक्षा यंत्रणेत केंद्रीय राखीव पोलीस दलाची भूमिका महत्त्वपूर्ण : पंतप्रधान
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व सदस्यांना-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " स्थापना दिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सर्व शूर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा.केंद्रीय राखीव पोलीस दल शौर्य आणि कर्तव्यतत्परतेसाठी ओळखले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेत या दलाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. राष्ट्रीय ऐक्यासाठी त्यांचे योगदान प्रशंसनीय आहे.''