श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालेल्या खेळाडूला द्रविडचा इशारा, म्हणाला...
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली नव्या दमाची टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या या मालिकेच्या दरम्यान भारतीय टीममधील प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असतील. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) जाणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्पिनर वरुण चक्रवर्तीची (Varun Chakravarthy) श्रीलंका दौऱ्यावर निवड झाली आहे. वरूणची यापूर्वी दोन वेळा आंतरराष्ट्रीय टीममध्ये निवड झाली होती. मात्र दोन्ही वेळेस दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याने अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.
वरुण आगामी दौऱ्याबाबत 'स्पोर्ट्स स्टार' शी बातचित केली. यावेळी त्याने सांगितले की, " मला फिटनेस टेस्ट पास होण्याची खात्री आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळण्याचं माझं स्वप्न आहे. मी स्वत:ला स्पिनर समजतो. मीडिया मला मिस्ट्री स्पिनर मानते. लेग स्पिन हा माझा स्टॉक बॉल आहे. तसेच माझ्याकडं गूगली आणि फ्लिपर आहे. मी माझी बॉलिंग आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करत आहे.
द्रविडनं दिला होता इशारा
वरुणने यावेळी राहुल द्रविडसोबत झालेल्या चर्चेचंही उदाहरण दिले. "त्यांनी (द्रविड) मला सांगितले की तुझ्यात क्षमता आहे. पण, कोणताही गोष्ट हलक्यात घेऊ नकोस. मी एनसीएमध्ये शिखर धवनला भेटलो आहे. तो एक आनंदी व्यक्ती आहे. त्याच्या कॅप्टनीमध्ये खेळण्यासाठी मी उत्सुक असल्याचे वरूणने सांगितले.