रत्नागिरीत करोनाबाधितांची संख्या वाढतीच

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रत्नागिरीत करोनाबाधितांची संख्या वाढतीच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ५६७ रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या अजूनही वाढतीच आहे. आज ४२७ जण करोनामुक्त झाले. नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अजूनही कमीच आहे.

 

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा - आरटीपीसीआर चाचणीनुसार ३५३, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २१४ (दोन्ही मिळून ५६७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४० हजार २०० झाली आहे.

 

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ६३२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज दोन हजार ७२४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ४२८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.  जिल्ह्यात आज ४२७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३४ हजार २१२ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.१० टक्के आहे.

 

जिल्ह्यात आज १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक , तर संगमेश्वर, दापोली, चिपळूण आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आज नोंदविला गेला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ३५६ झाली आहे. मृत्युदर .३७ टक्के आहे.  तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी - रत्नागिरी ४०४, खेड १३३, गुहागर ९६, दापोली ११८, चिपळूण २६४, संगमेश्वर १६२, लांजा ६९, राजापूर ९८, मंडणगड १२. (एकूण १३५६).