ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव हुदलीकर यांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून श्रद्धांजली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नाशिक : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे बुधवारी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कै. हुदलीकर यांनी श्रद्धांजली अर्पण केलीय.
आपल्या शोक संदेशात भुजबळ म्हणाले की, मुळचे समाजवादी पक्षाचे असलेले कै. वसंतराव हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक देशातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील हुतात्मा स्मारकाचे ते सर्वेसर्वा होते. याठिकाणी खेड्या पाड्यातील विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुरुकुलासारखे सांभाळत होते. तसेच शहीद कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा पुढाकार होता. महात्मा गांधीच्या विचारांची जोपासना करत आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी खर्ची केले. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले आहे. त्यांच्या निधनाने हुदलीकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय हुदलीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली ! अशा शब्दा भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.