नेतन्याहूंचा ऐतिहासिक विजय

0

जेरुसलेम, दि. 10 ः इस्रायलच्या पंतप्रधानपदी पुन्हा बेंजामिन नेतन्याहू यांची निवड निश्चित झाली आहे. त्यांनी पंतप्रधान होण्याची ही पाचवी आणि सलग चौथी वेळ आहे. यासोबतच, पंतप्रधान पदी निवडून आल्यानंतर नेतन्याहू इस्रायलच्या 71 वर्षांच्या इतिहासात सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणारे नेते बनले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत 97 टक्के मतमोजणी झाली. त्यामध्ये नेतन्याहू यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी आणि माजी लष्करप्रमुख बेनी गेंट्झ या दोघांची स्पष्ट विजय दिसून येत नाही. तरीही नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीने उजव्या आघाडीसह सरकार स्थापित करण्याइतक्या जागा मिळवल्या आहेत. इस्रायलच्या उजव्या आघाडीचे तसेच लिकुड पार्टीचे नेते नेतन्याहू आणि नव्याने स्थापित झालेल्या ब्लू अॅन्ड व्हाइट पक्षाचे नेते गेंट्झ यांच्यात मुख्य लढत होती. या दोन्ही उमेदवारांच्या पक्षाने प्रत्येकी 35-35 जागा मिळवल्या आहेत. हे दोघेही सरकार स्थापनेचा दावा करत असले तरीही नेतन्याहू यांच्या उजव्या आघाडीच्या जास्त जागा असल्याचे समोर आले आहे. 120 सदस्य संख्या असलेल्या इस्रायलच्या नेसेटमध्ये गेल्या 71 वर्षांत कुठल्याही एका पक्षाने स्वबळावर सरकार स्थापित केलेले नाही. अर्थातच त्या सर्वच पक्षांना आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा करावा लागला आहे.

Share.

About Author

Leave A Reply