आता कोर्टानंच सांगितलंय, चौकीदार चोर है…- राहुल गांधी

0

नवी दिल्ली, दि. 10ः राफेल प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला मोठा झटका दिला आहे. न्यायालयानं राफेल प्रकरणावर दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची तयारी दर्शवली आहे. राफेल डील प्रकरणाची दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शविली असून, याप्रकरणी केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून लावला. राफेल डीलवरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला विरोधकांनी लक्ष्य केले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुली चर्चा करावी, असं ओपन चॅलेंज राहुल गांधींनी मोदींना दिलं आहे. राफेलमध्ये घोटाळा झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानंच आता स्पष्ट केलं आहे. आता कोर्टानंच सांगितलंय, चौकीदार चोर है…. त्यामुळे मोदींनी खुल्या चर्चेचं माझं आव्हान स्वीकारावं, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी राफेल प्रकरणावर उत्तर देताना न्यायालयावर विश्वास नाही का, असं म्हटलं होतं. आता त्याच सर्वोच्च न्यायालयानं मोदींना राफेल प्रकरणात मोठा झटका दिला आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सुरजेवाला ट्विट करत म्हणाले, मोदींनी सत्यापासून कितीही पळ काढला तरी आज ना उद्या ते समोर येईलच. राफेल घोटाळ्यातील एक एक साखळी हळूहळू उघडतेय. आता कोणताही गोपनीयतेचा कायदा नाही. ज्याच्या पाठीमागे मोदी लपू शकतात. सर्वोच्च न्यायालयानं न्यायाचा हा सिद्धांत कायम ठेवला आहे.

Share.

About Author

Leave A Reply