टेरर फंडिगप्रकरणी फुटिरतावादी यासीन मलिकला अटक

0

जम्मू, दि. 10 : जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा प्रमुख व फुटिरतावादी नेता यासिन मलिक याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे.
टेरर फंडिंग प्रकरणी आणि दहशतवादी कारवायांप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर यासिनला जम्मूतील एनआयएच्या विशेष न्यायलयासमोर हजर करण्यात आले असून त्याची 22 एप्रिलपर्यंतच्या कोठ़डीत रवानगी केली आहे. त्यानंतर त्याला दिल्लीला आणण्यात आले असून तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिहारमध्ये यासिनला ठेवलेल्या कोठडीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने यासिन मलिकच्या जेकेएलएफवर बंदी घातली होती. दहशतवादीविरोधी कायद्याखाली त्याच्या या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

Share.

About Author

Leave A Reply