पाकिस्तानात पुन्हा बॉलिवूड सिनेमांवर बंदी

0

नवी दिल्ली, दि. 28: पाकिस्तानमधील बॉलिवूड सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पाकिस्तानात भारतीय चित्रपट व टीव्ही शोवर बंदी घातली आहे.
सीुप्रीम कोर्टाने अलीकडेच
बॉलिवूड सिनेमा व टीव्हीशोवरील बंदी उठवली होती. परंतु, युनाइटेड प्रोड्यूसर्स असोसिएशनने दाखल केलेल्या
याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश साकिब मियॉं यांनी सिनेमातील हिंदी कंटेन्टवर बंदी आणतानाच जे कंटेन्ट प्रेक्षकांसाठी योग्य आहेत, तेच प्रसारीत करण्याचे आदेश दिले.
तसेच भारतीय लोक पाकिस्तानच्या धरण बांधणीच्या कामात अडथळा आणत असताना आपण त्यांच्या चित्रपटांवर बंदी का आणू शकत नाही? असा सवालही त्यांनी केला होता. पाकिस्तानात बॉलिवूड सिनेमांवर बंदी येण्याची ही पहिलीच वेळ नाही.पाकिस्तानने या आधी बॉलिवूड चित्रपट व टीव्हीशो बंदी घातलेली आहे. यापूर्वी 2017 मध्ये पाकिस्तानइलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने भारतीय चित्रपटांवर बंदी घातली होती.
त्यानंतर भारतीय वाहिन्यांवर तसेच एफएम वाहिन्यांवरही बंदी घातली होती. मात्र काही काळानंतर लाहोर कोर्टाच्या निर्णयानंतर ही बंदी मागे घेण्यात आली होती. त्याला पाक सरकारने आक्षेप घेतला नव्हता.

Share.

About Author

Leave A Reply