पक्षी अभयारण्य जायकवाडीत; महोत्सव मात्र औरंगाबादेत

0

पैठण, दि. 19 : जायकवाडी जलाशयाच्या परिसरात पक्षी अभयारण्य असतानासुद्धा पक्षी महोत्सवाचा कार्यक्रम जानेवारी रोजी औरंगाबादला साजरा करण्यात येत आहे. जायकवाडी परिसरात पक्षी महोत्सवासाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध असताना पक्षी मित्रांसाठी महत्त्वाचा असलेला हा महोत्सव औरंगाबादमध्ये घेण्यात येत असल्याने येथील पक्षी मित्रांमध्ये नाराजी पसरली आहे.
जानेवारी रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्यात केवळ पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पक्षी मित्रांसाठी पर्वणी असलेला हा महोत्सव जायकवाडी अभयारण्य परिसरात न घेता औरंगाबादला घेण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतल्याने स्थानिक पक्षी मित्र हिरमुसले आहेत. पक्षी अभयारण्य जायकवाडी परिसरात असताना येथील देशी-विदेशी पाहुण्या पक्षांची सर्वसामान्यांना व हौशी पक्षीमित्रांना ओळख व माहिती मिळावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. गतवर्षीही या महोत्सवाचे आयोजन औरंगाबादला करण्यात आले होते. त्यामुळे यंदा तरी पक्षी महोत्सव जायकवाडीला घेण्यात येईल, असे पक्षी मित्रांना अपेक्षित होते. मात्र वन्यजीव विभागाने पुन्हा औरंगाबादलाच पसंती दिल्याने पक्षी मित्रांमध्ये नाराजी पसरली आहे.

Share.

About Author

Leave A Reply