ओपन कराटे जीत कुने डो स्पर्धेत रिलायन्स नागोठणेच्या कराटेपट्टंची सुवर्णपदकाची लयलुट

0

पाली-बेणसे, दि. 22 : भिवंडी ठाणे येथे स्पोर्टस जित कुने-डो- फेडरेशन ऑफ इंडिया व स्पोर्टस आर्शल मार्टस ऍकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत केलेल्या 11 व्या राज्यस्तरीय ओपन कराटे जीत कुने डो चॅम्पीयनशिप स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे येथील कराटेपट्टुंनी दैदिप्यमान कामगिरि करीत सुवर्णपदकाची लयलुट केली.
या स्पर्धेत नागोठणे टाउनशिप येथील शोतोकान कराटे डो युन्हिवर्सिटी या संस्थेच्या कराटेपट्टुंनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील 360 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रिलायन्स नागोठणे येथील कराटेपट्टुंनी काता (फॉर्म), कुमिते (फाईट) या प्रकारात घवघवीत यश संपादन केले. या सर्व कराटेपट्टुंना 8 डिग्री ब्लॅक बेल्ट ग्रॅन्ड मास्टर उमेश कुलकर्णी यांचे स्पर्धाभिमुख व अचुक मार्गदर्शन लाभले. यश संपादन केलेल्या कराटेपट्टुंमध्ये सिध्दी दोलतडे- येलो बेल्ट (काता- सुवर्ण, कुमिते- रौप्य), साईराज पुजारी- ग्रीन बेल्ट (काता- कास्य, कुमीते- कास्य), शुभम यादव- गीरन बेल्ट (काता- सुवर्ण, कुमिते- रौप्य), समिक्ष दोलतडे- ऑरेंन्ज बेल्ट (काता- रौप्य, कुमिते- कास्य), गौरी गनाचारी- ज्यू ब्राउन बेल्ट (काता- सुवर्ण, कुमिते- रौप्य), ऋत्विक वुरीटी- ग्रीन बेल्ट (काता- सुवर्ण, कुमिते- सुवर्ण), अभिषेक नाडर- पर्पल बेल्ट (काता- कास्य, कुमिते सुवर्ण), रुद्राणी पात्रा- ब्लू बेल्ट (काता- रौप्य, कुमिते- रौप्य), विनीत पाटील- ग्रीन बेल्ट (काता- सुवर्ण, कुमिते- सुवर्ण), निखिल मराडी- ऑरेंज बेल्ट (काता- कास्य, कुमिते- सुवर्ण), कोयल नाडर- ज्यू ब्राउन बेल्ट (काता- कास्य, कुमिते- सुवर्ण), निच्छल नायगा- सिनीयर ब्राउन बेल्ट (काता- सुवर्ण, कुमिते- रौप्य), गिरीजा ठाकूर- ब्ल्यू बेल्ट( काता- सुवर्ण, कुमिते- सुवर्ण), रोहित प्रधान- ज्यू ब्राउन बेल्ट (काता- रौप्य, कुमिते- सुवर्ण), आर्यन ठाकूर- ज्यू ब्राउन बेल्ट (काता-सुवर्ण, कुमिते- सुवर्ण), राधिका घरतकर- बाउन बेल्ट (काता- रौप्य, कुमिते- रौप्य), साहिल ढमाले- 1 डिग्री बेल्ट (काता- सुवर्ण, कुमिते- सुवर्ण) आदी पदके पटकाविली. सदर स्पर्धेत द्वितीय क्रमांकाच्या सर्वाधिक सुवर्णपदाकाचा वेध घेवून एस.के.यु.च्या कराटेपट्टुंनी द्वितीय ग्रॅन्ड चॅम्पीयनशिप ट्रॉफी (16 सुवर्णपदके) सेन्साय राधिका घरत यांना टिम मॅनेजरची ट्रॅफी देउन सन्मानीत करण्यात आले. या संघाला वरिष्ट प्रशिक्षक सेन्साय सचिन हुजरे (थ्री डिग्री ब्लॅक बेल्ट) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या चॅम्पीयनशिप करीता कराटे क्लासची व्यवस्थापनाची जबाबदारी सौ. स्मिता दोलतोडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. यशप्राप्त कराटेपट्टुंवर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share.

About Author

Leave A Reply